अमरावती येथील हॉटेल ग्रेस इन येथे दि ०७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र ग्राम दर्पण, जलजीवन मिशन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष अंतर्गत पाणी गुणवत्ता विषयक प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. या जिल्हा स्तरीय प्रशिक्षणामध्ये मा.संजय खारकर साहेब (उप.मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता ), मा.आमझरे साहेब (गट विकास अधिकारी चांदुर बाजार) , मा.घाणेकर साहेब (डेफ्टी इंजिनिअर चांदुर रेल्वे), मा.मनीषा सूर्यवंशी (अतिरिक्त जिल्हा अधिकारी साथ रोग) , मा.मूनमुने साहेब (विस्तार अधिकारी आरोग्य ,दर्यापूर) , मा.तुषार दांडगे (BDO पंचायत समिती भात कुली ) यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र ग्राम दर्पण च्या वाचन साहित्य तसेच प्रशिक्षणामध्ये देण्यात येणाऱ्या संपूर्ण साहित्याचे विमोचन करण्यात आले. या वेळेस जिल्हा परिषद चे अभियंता, तसेच पाणी व स्वच्छता विभाग अमरावती येथील कर्मचारी,सर्व तालुका पंचायत समिती BDO कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान प्रशिक्षणामध्ये सर्व उपस्थितांना साहित्य वाटप करण्यात आले.
सदर प्रशिक्षणामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या पाणी गुणवत्ता विषयक अम्मलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक सूचना, पाणी गुणवत्तेचे महत्व, पाणी गुणवत्ता विषयक ग्रामपंचायत व जलसुरंक्षक यांची जबाबदारी इत्यादी बाबींचा समावेश होता. या प्रशिक्षणामुळे शासनाचे पाणी गुणवत्ता विषयक धोरणाची माहिती मिळून ग्रामपंचायत स्तरावर अंमलबजावणी होईल. या उद्देशाने महाराष्ट्र ग्राम दर्पण, जलजीवन मिशन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष अंतर्गत पाणी गुणवत्ता विषयक प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन अमरावती येथे करण्यात आले होते.
दि .8/3/2025 रोजी महाराष्ट्र ग्राम दर्पण,आदर्श अपारमेन्ट,अमरावती येथे महिला दिनाचा कार्यक्रम सर्व महिला कर्मचारी यांचा सन्मान करून साजरा करण्यात आला .कार्यक्रम मा.रविराज देशमुख (प्रधाम सचिव)तसेच मा.गायत्री तिडके(कोशाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनामध्ये कार्यक्रम घेण्यात आला असून श्री .सुबोध देशमुख(मु. का.अधिकारी),रवींद्र देशमुख,सोनाली पुंडकर,देवळे सर,सोनल बदरके,हर्षरत्न पाते,शुभांगी राऊत,नेहा पंत,प्राप्ती कडू,दीपाली रोडे,प्रतीक्षा धसकट,साक्षी भोंगे,पूजा राऊत,भस्मे सर,रवींद्र देशमुख,सुमित जनबंधु, ऋषी सर या सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने करकर्माचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमात सर्व कर्मचाऱ्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा सोबतच आपले आपले महिला दिनाचे महत्व आपल्या शब्दात मांडले,तसेच काही महिला सक्षमीकरणासाठी परिवर्तन करण्याची जवाबदारी स्वीकारून कार्यक्रमाचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला.
अंजनगाव सुर्जी येथे दि .१० मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र ग्राम दर्पण,अमरावती अंतर्गत महादेव यावकर स्मृती भवन येथे पाणी गुणवत्ता माहिती तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन मा.काजल ठाकरे (कनिष्ठ अभियंता उपविभाग), तसेच मा.मंजूषा मुरकाळे (कनिष्ठ अभियंता उपविभाग) यांच्या हस्ते पाणी पूजन करून करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संचालन प्रवीण प्रशिक्षक गिरीधर चावरे यांनी केले. तर पाणी शुद्धीकरणा संबंधी प्रात्यक्षिक हरिचरण पहाडन, FTK किट प्रात्यक्षिक प्रणाली देशमुख यांनी दिले. प्रशिक्षणाला श्री राजेश मानमोडे (BRC अंजनगाव सुर्जी) यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सोनल बदरके, पूजा जाधव तसेच महाराष्ट्र ग्राम दर्पण यांच्या सर्व कर्मचारी यांचे अथक परिश्रम यांनी अथक परिश्रम घेतले.
सदर प्रशिक्षणामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या पाणी गुणवत्ता विषयक अम्मलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक सूचना, पाणी गुणवत्तेचे महत्व, पाणी गुणवत्ता विषयक ग्रामपंचायत व जलसुरंक्षक यांची जबाबदारी इत्यादी बाबींचा समावेश होता. या प्रशिक्षणामुळे शासनाचे पाणी गुणवत्ता विषयक धोरणाची माहिती मिळून ग्रामपंचायत स्तरावर अंमलबजावणी होईल. या उद्देशाने महाराष्ट्र ग्राम दर्पण, जलजीवन मिशन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष अंतर्गत पाणी गुणवत्ता विषयक प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन अंजनगाव सुर्जी येथे करण्यात आले होते.
महाराष्ट्र ग्राम दर्पण अंतर्गत 17/3/2025 रोजी नवसारी ,अमरावती येथील बुद्ध विहारामध्ये शेकडो महिलांच्या उपस्थितीमध्ये महिला दिन मा.रविराज देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये साजरा करण्यात आला.यामध्ये अध्यक्ष म्हणून मा.गायत्री तिडके (महाराष्ट्र ग्राम दर्पण कोष्यध्यक्ष),प्रमुख वक्ता म्हणून मा.तेजस्विनी वानखडे (भूवैज्ञानिक अमरावती विभाग),मा.सुबोध देशमुख (मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र ग्राम दर्पण),मा.गिरीधर चावरे (प्रवीण प्रशिक्षक ),ह्या विशेष व्यक्तिमत्वाचे मानकरी मान्यवर यांनी मंचाची शोभा वाढवली.तर कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन पूजा वानखडे ताई यांनी केले .उपस्थित मान्यवरांचे स्वागत आशा ताई,सोनू गायकवाड,वंदना ताई,विजया बारबुध्ये यांनी केले .तर नवसारी मधील नवयुवती सलोनी गायकवाड ,साक्षी थोरात,ईश्वरी बडे ,श्रया बडे ,ह्यांनी महिलाच आयुष्य प्रदर्शित करणार छान नृत्य सादर करून उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या,तर कार्यक्रमा ची सुरवात मा सावित्री बाई च्या फोटो पूजनाने केली तसेच बाबासाहेबांच्या पुतळ्याचे तसेच गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पूजन करून सुरवात करण्यात आली.कार्यक्रमामध्ये महिलांच्या आंतरिक गुणांच्या विकासावर भर देण्यात आला तसेच मा.तेजस्विनी वानखडे मॅडम ह्यांनी शाश्वत उपजविका तयार करण्यासाठी च सखोल आणि अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले आणि उपस्थित महिलांना प्रोत्साहन दिले.कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सोनाली पुंडकर,रवींद्र देशमुख,सुमित जनबंधु ,ऋषी कडू,मोहन सर, महाराष्ट्र ग्राम दर्पण,नवसारी येथील महिला बचत गट यांचे अथक परिश्रमातून कार्यक्रम यशस्वी पार पडला
दि 20/3/2025 रोजी महाराष्ट्र ग्राम दर्पण ,अमरावती अंतर्गत गुरुदेव प्रार्थना मंदिर ,अमरावती येथे पाणी गुणवत्ता माहिती व प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला .ह्यामध्ये गावपातळीवरील जलसखी सहभागी झाल्या असून कार्यक्रमाची सुरुवात जल पूजनाने करण्यात आली .त्या सोबतच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना पाटील मॅडम यांनी केले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून अश्विनी वानखेडे ,प्रमुख पाहुण्या मा.कांचन गवई ह्यांनी मान्यवरांचे पद भूषविले .संपूर्ण ट्रेनिंग मध्ये ट्रेनिंग च्या विषयाचे तज्ञ असे ज्योती अवघड मॅडम,प्रणाली देशमुख मॅडम ,वैद्य सर,अरविंद भगत सर ह्यांनी प्रवीण प्रशिक्षक म्हणून सर्व विषयाचे सत्र घेण्याची जबाबदारी पार पाडली .कार्यक्रमाचे मा.अश्विनी वानखेडे ,तसेच मा.कांचन गवई ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रशिक्षणाच्या सुंदर आयोजनाबाबत महाराष्ट्र ग्राम दर्पण चे आभार व्यक्त केले .मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करून प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला
पुनर्भरण, तंत्र, भूजलस्रोत पुनर्भरण, रिचार्ज या विविध विषयावर प्रशिक्षण संपन्न
अमरावती प्रतिनिधी (दिनांक २० जून): महाराष्ट्र ग्राम दर्पण अंतर्गत दि.18/6/2026ते दि.19/6/2025 रोजी चूरणी, चिखलदरा ,येथे जल जीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात पाणी पूजन करून उद्घाटन मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, जलसुरक्षक, पाणी पुरवठा समिती सदस्य यांच्या उपस्थिती मध्ये तसेच महाराष्ट्र ग्राम दर्पण ,अमरावती तज्ञ टीम यांच्या सहकार्याने प्रशिक्षण उत्कृष्ट रित्या पार पाडण्यात आले. प्रशिक्षणाला स्त्रोत पुनर्भरण, तंत्र, भूजलस्रोत पुनर्भरण, रिचार्ज या विविध विषयाचे अगदी उत्साहात, विविध खेळ, गीत, अनुभव, मनोगत विविध मार्गातून चर्चा सत्र, व्याख्यान, अशा विविध मार्गातून विषय प्रशिक्षणार्थी यांच्या पर्यंत पोहचवण्यात आले. दि19/6/2025 रोजी प्रमाणपत्र वितरण तसेच प्रशिक्षणार्थी यांचे मनोगत घेऊन प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला
मंगरूळ दस्त गीर येथे महाराष्ट्र ग्राम दर्पण अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वती करण या विषयाचे प्रशिक्षण आमदार प्रताप अडसड यांच्याहस्ते प्रशिक्षणाचे उदघाटन: प्रशिक्षणार्थी यांच्या सोबत साधला संवाद
महाराष्ट्र ग्राम दर्पण अंतर्गत दि.18/6/2026 ते दि.19/6/2025 रोजी चूरणी,चिखलदरा , येथे जल जीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात पाणी पूजन करून उद्घाटन मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला सरपंच,उपसरपंच, जलसुरक्षक, पाणी पुरवठा समिती सदस्य यांच्या उपस्थिती मध्ये तसेच महाराष्ट्र ग्राम दर्पण ,अमरावती तज्ञ टीम यांच्या सहकार्याने प्रशिक्षण उत्कृष्ट रित्या पार पाडण्यात आले.प्रशिक्षणाला स्त्रोत पुनर्भरण,तंत्र, भूजलस्रोत पुनर्भरण, रिचार्ज या विविध विषयाचे अगदी उत्साहात ,विविध खेळ, गीत,अनुभव,मनोगत विविध मार्गातून चर्चा सत्र,व्याख्यान,अशा विविध मार्गातून विषय प्रशिक्षणार्थी यांच्या पर्यंत पोहचवण्यात आले. दि19/6/2025 रोजी प्रमाणपत्र वितरण तसेच प्रशिक्षणार्थी यांचे मनोगत घेऊन प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला आला
Covered area is Water Supply, Cheap Latrines.Targeted group is People under poverty line and beneficiaries under target who did not take advantage of the scheme . Latrine 1080, Homes 200, and tree plantation in Corporation area take the benefits.
Covered area 25 Hector Water level increased in an around 25 Hectors Nature of Beneficiaries Village cattle provided drinking water similarly Farmers facilitated to irrigate 10% farmers is a beneficiaries.
Maharashtra Gram Darpan working as a Technical service provider, Z.P. Amravati & Akola. Largest water supply scheme (Tiwsa village water supply scheme) 8.42 crore is going on completion under the super vision of MGS & 39 crore kapileshwar +25 village water supply schemes work in progress Morshi consil’s D.P.R. of sanitation & Water supply work in progress. Same work of Digras Municipal council is in progress.
In Pimpalvihir Taq. Dist. Amravati as development. Such village as a Ideal village, At present no work done without public contribution. To self development & village development. Every people involved in development of village At present all society work in village development such as Medical ,Educational ,Water supply and Management . Agricultural Management, Animal Management & Technical
Providing Individual latrine and water connection to SC & Navbaudhdh under Maharashtra Suvarna Mohotsavi Nagari Dalit Vasti Pani Purvati & Swachchata Yojana in Morshi Nagar Parishad,Morshi, Digras Nagar Parishad ,Digras.
Build the Low Budget House at Navsari under Walmi Ambedkar Aavas Yogana.low house budget get to 150 beneficiaries.